टिळा लावणे ...याचे महत्व व साध्य
टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. आर्य धर्मात
प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू
आणि पदार्थाचे असतो.
उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे
प्रमुख आहे. पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय
भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि, संगमाच्या किनार्यावर "गंगा
स्नान" केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष
प्राप्ती होते. कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक
महत्व आहे. आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा
केंद्र आहे जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा
लावतो, तिथे आज्ञाचक्र असतो. हा चक्र आपल्या
शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे. इथे
आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या १)
इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला
"त्रिवेणी" किवा "संगम" पण म्हणतात.
हे गुरु स्थान
आहे. इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.
हे आपल्या
चेतनाचे मुख्य स्थान पण आहे.
याला मनाचे घर पण म्हणतात.
यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त
पूजनीय आहे. योग मध्ये ध्यान करता
वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.
टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणार्याचे
सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो. टिळा काही खास
प्रयोजना साठी पण लावतात.
जसे
मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा
अंगठ्याने..
शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनीने
धनप्राप्ती हेतू मध्यमानीआणि
शांती प्राप्ती साठी अनामिकानि
टिळा लावला जातो.
साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण
चंदनाचे लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित
होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते.
म्हणून टिळा जरूर लावावा.
आर्य प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ
आहे. टिळा आर्य संस्कृती ची ओळख
आहे. टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण
पण आहे.
स्नान झाल्यावर कपाळावर टिळा,गंध का लावतात?.
आपला देह म्हणजे ईश्वराचे मंदीर आहे. मंदिरात जो
सर्वत्र ईश्वरी भाव असतो तसाच देहात रोमारोमात होणारे
स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हे
ईश्वरी तत्व विशेषकरून मर्मस्थानात
प्रतीतीस येते. भ्रुकुटीचे
मध्यभागी अज्ञाचक्रावर
सगूण परमेश्वर वास करतो.देहाला मायेची
उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच
पूजा करणे प्रशस्त असते.म्हणून स्नान झाल्यावर कपाळाचे
मध्यभागी असणाऱ्या परमेश्वराच्या मूर्तीस
टिळा लावावा
*म्हणजे ही सुद्धा एक छोटी देवपूजा
असते.*
ज्यांना कामाचा भरपुर व्याप असून श्वास घ्यायला
देखील फुरसत मिळत नाही अशा
माणसांनी स्नान झाल्यावर किमान कपाळी टिळा
तरी लावावा. त्या निमित्ताने भगवंताची पूजा
होते.
टिळा लावताना मधल्या बोटाने लावावा मधल्या बोटाचा संबंध
ह्रदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित
होणरी स्पंदने ह्रदयापर्यंत जाऊन भिडतात.
जप सुद्धा
करताना मधले बोट वापरतात त्यामुळे दिवसभर मन शांत व
भक्तिभावाने राहते.टिळा लावल्यामुळे मनुष्य सहसा पापकर्माकडे
वळत नाही.
कारण जो टिळा लावतो तो देवाला मानतो.समाज
देखील त्याच्याकडे सन्मानाने बघत असतो. *हिंदू
धर्माखेरीज इतर कोणत्याही धर्माचे लोक
टिळा लावत नाहीत.*
या बाबतीत कठोपनिषदात असे सांगितले आहे
की ह्रदयातून निघणाऱ्या शंभर प्रमुख
नाड्यांपैकी सुषुम्ना ही नाडी
मस्तकाच्या समोरील भागातून निघते.
यातूनच मोक्ष मार्ग
निघत़ो जो ऊर्ध्व दिशेने जातो. माणसाचा मृत्यू झाल्यावर
जीवात्मा या मार्गाने गमन करता झाला तर त्याला त्वरित
गति मिळते.म्हणूनच कपाळी तिलक धारण करतात.
चंदनाच्या टिळ्याला महत्त्व आहे
कारण नाकातून वाहणाऱ्या दोन
नाड्यांपैकी एक धन व दुसरी ऋण
असते.धन नाडीतून श्वास वाहताना निर्माण
होणारी उष्णता रोखण्यासाठी चंदनतिलक
महत्वाची कामगिरी बजावतो. कपाळावर टिळा
लावताना औषधी चंदन,हळद, अष्टगंध,
गुलाल,कृष्णचंदन,बुक्का इत्यादि चा शुद्ध टिळा लावावा.
पटल तर टिळा लावायला आता लाजु नका. आपल्या पुर्वजांचा व वैज्ञानीक संस्कृतीचा अभिमान बाळगुया....आज पासुन टिळा लावण्यास सुरुवात करुया.
वास्तु शास्त्र मार्गदर्शन
8408943993